नाट्य अभिवाचन स्पर्धेत कळंत्री विद्यालयाला दुहेरी मुकुट

0

चाळीसगाव । तालुक्यातील आंतरशालेय सांघिक नाट्य व अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात चंपाबाई रामरतन कळंत्री प्राथमिक विद्यालयाने दुहेरी यश संपादन केले आहे. नेताजी चौकातील पुर्णपात्रे माध्यमिक विद्यालयात झालेल्या या स्पर्धेत लहान गट (चौथी ते सातवी) व मोठा गट (आठवी ते दहावी) या दोनही गटात शहरी व ग्रामीण भागातील चौदा संघानी सहभाग घेतला होता. त्यात दोनही गटात कळंत्री विद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळविला. या नाट्यअभिवाचन स्पर्धेत लहान गटातील कु.रूचिका गायकवाड, पुजा राजपूत, राजेंद्र मोरे, श्रीवणी सोनार, जागृती पवार या विद्यार्थ्यांनी ‘जाणीव’ या नाटकाचे अभिवाचन केले. तसेच मोठ्या गटातील कु.वैष्णवी देशमुख, कल्याणी महाले, आकाश पाटील, धनंजय पवार, सौरभ पाटील, पवनराज पाटील, हिमांशू अहिरे, सचिन पाटील या विद्यार्थ्यांनी ‘अडचण’ या नाटकाचे अभिवाचन केले.

यशस्वितेसाठी यांचे परीश्रम विजेत्या संघाला सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका संगिता मोरणकर, दिपाली पाटील, आश्‍विनी पाटील, स्वाती गरूड व पंकज सोनवणे यांच्यासह पालक सचिन अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. या दोन्ही संघाचे शाळेचे चेअरमन डॉ. सुनिल राजपूत व मुख्याध्यापक प्रमोद दायमा यांनी कौतूक केले.