भुसावळ । नुकत्याच पार पडलेल्या विज्ञान नाट्यमहोत्सवात तालुक्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यात के.नारखेडे विद्यालयाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. या संघाची जिल्हा पातळीवर निवड करण्यात आली. नाट्य महोत्सवातील विजयी स्पर्धकांना गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते, विस्तार अधिकारी प्रतिभा सानप, संगीता बियाणी आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
दहावी, नववीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कौतुक केले जात आहे. त्यात विद्यालयातील इयत्ता 10 वी व 9 वीतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यशस्वीतेसाठी शाळेतील विज्ञान शिक्षकांनी परीश्रम घेतले.