मुलुंड- शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असणार्या ९८ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा कालिदास नाट्यमंदिरात पडदा आज उघडणार आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, नट प्रसाद सावकार यांना ते जिवंत असतानांच श्रद्धांजली वाहण्याचा प्रताप करून नाट्य परिषदेने केला आहे. सावकार हयात असल्याचे लक्षात आणून दिल्यावर घाईघाईने सावकार यांचे छायाचित्र हटविण्यात आले.
नाट्य परिषदेने संमेलनात पुल देशपांडे, चिंतामणराव कोल्हटकर, सदाशिव अमरापूकर, रसिका जोशी, निळू फुले या दिवंगत नाटककार, कलाकारांसोबतच हयात असलेले संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक नट प्रसाद सावकार यांचे देखील छायाचित्र होर्डिंगवर लावले होते. पण ही चूक संयोजकाच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने प्रसाद सावकारांचे छायाचित्र होर्डिंगवरुन हटवले.