नाट्य सादरीकरण स्पर्धेचे उद्घाटन

0

भुसावळ । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभाग व नाहाटा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 18 रोजी सकाळी 10 वाजता विद्यापीठस्तरीय नाट्य सादरीकरण स्पर्धेचे उद्घाटन प्रा.डॉ. जी.ए. उस्मानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संवादाचे महत्व या विषयी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच इतर स्पर्धांमध्येही सहभाग घ्यावा, असे
आवाहन केले.

कला हे उदरनिर्वाहाचे साधन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला शाखेचे उपप्राचार्य प्रा.डॉ. ए.डी. गोस्वामी उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना संदेश दिला की, आपली कला ही आपल्या उदरनिर्वाहाचे साधनही असते. तसेच वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्रा. एन.ई. भंगाळे, नाट्य कला मार्गदर्शक वैभव मावळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. एस.के. राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात वैभव मावळे यांनी विद्यार्थ्यांना अभिनय करायला सांगितले व त्यानंतर त्यांना अभिनय कलेविषयी मार्गदर्शन केले. दुसर्‍या सत्रात अनिल कोष्टी यांनी विद्यार्थ्यांना दिग्दर्शक व नैपथ्य याविषयी मार्गदर्शन केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व परिसरातील महाविद्यालयाच्या 70 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला. सुत्रसंचालन प्रा. समाधान पाटील यांनी केले तर आभार डॉ. गौरी पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. डी.एम. देशमुख, डॉ. जे.एफ. पाटील, प्रा.डॉ. किरण वारके, प्रा. एन.एस. धांडे, प्रा. जितेेंद्र आडोकार, प्रा. प्रफुल्ल इंगोेले, प्रा. अजय तायडे, प्रा. नयना पाटील, प्रा.डॉ. रुपाली चौधरी यांनी परिश्रम घेतले.