भुसावळ : बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील महेंद्र बाजीराव पाटील (40) यांचा मधुमेह आजाराने मंगळवारी सकाळी 10 वाजता मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर बोदवड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. याबाबत राजेंद्र मंगलसिंग पाटील (रा.नाडगाव) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक प्रवीण चौधरी करीत आहेत.