नाडगावला ओडीए पाईप लाईन फुटली ; लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

0

बोदवड- तालुक्यात नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना तालुक्यातील 26 गावांना पाणीपुरवठा करणारी ओडीएच्या योजनेची पाईप लाईन बोदवड आणि नाडगावमध्ये फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. नवीन पाईप लाईनीसाठी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदला जात असताना दोन ठिकाणी पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडल्या.

लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
पहिली घटना शहरातील मुक्ताईनगर-बोदवड रस्त्यावरील नाडगाव येथील प्रतिभाताई पाटील नगरजवळ 13 रोजी पहाटे दोनच्या सुमारास तर दुसरी घटना सकाळी सातला बोदवड शहातील जुन्या तहसीलजवळ घडली. सद्य:स्थितीत ओडीएची पाईपलाईन जीर्ण झाल्याने या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी सध्या जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. हे खड्डे खोदत असताना ओडीएच्या जीर्ण पाईप लाईनला जेसीबी यंत्रणा धक्का लागला आणि जीर्ण पाईप लाईन फुटली. मुक्ताईनगर-बोदवड रस्त्यावरील नाडगाव येथे सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. परीणामी पहाटेपासून तर दुपारपर्यंत हजारो लीटर शुद्ध पाण्याची नासाडी झाली. ही जीर्ण पाईपलाईन सोमवारी दुपारी दोन-अडीचच्या सुमारास जोडण्यात ओडीएच्या कर्मचार्‍यांना यश आल्यानंतर रस्त्यावरून पाणी वाहणे थांबले.