नाडगावात किरकोळ कारणावरून एकास मारहाण

0
बोदवड :- तालुक्यातील नाडगाव रेल्वे गेटजवळ पत्ते खेळण्यास जावू नका, असे सांगितल्याचा राग आल्याने एकास चौघांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी नऊ वाजता घडली.
या प्रकरणी  सुकलाल बारी (अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी विक्की गुरचळ, नीलेश गुरचळ, सूर्यकांत गुरचळ, राठोड  (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत आरोपी चारचाकीतून जात असताना रेल्वे येत असल्याने गेट बंद होते. याचवेळी तक्रारदाराने आरोपींना तुम्ही पत्ते खेळणार्‍यांकडे जावू नका, असे सांगितल्याने आरोपींनी लोखंडी रॉडने मारहाण केली, असे तक्रारीत नमूद आहे. तपास उपनिरीक्षक बारकू जाने करीत आहेत.