भुसावळ : बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे वायरमन यास किरकोळ कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार वायरमन जितेंद्र लक्ष्मण माळी (भू माता नगर, स्वामी समर्थ नगर, बोदवड) हे संशयीत आरोपी जितेंद्र देविदास कुरपाळे (रा.शाहु नगर, नाडगाव) यांना शेतातील अनधिकृत वीजपुरवठा बंद करण्यासंदर्भात सांगण्यास गेले असता आरोपी कुरपाळे यांनी शासकीय कामात अडथळा आणत मारहाण करीत शिवीगाळ केली.
सोमवारी सकाळी 11.30 नाडगाव आरोपीच्या घराजवळ ही घटना घडली. तपास उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहेत.