नाणारच्या मुद्यावर शिवसेनेचा मंत्रिमंडळ बैठकीत निषेध!

0
उद्या उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा
मुंबई- नाणार प्रकल्पावरून सुरु असलेला भाजप-शिवसेनेतील तिढा सुटण्याचे नाव घेत नाहीये. नानार प्रकल्पाला शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता केंद्र सरकारने नाणार प्रकल्पाबाबत आखाती देशांच्या कंपनीशी तीन कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. याचा शिवसेनेने मंत्रिमंडळ बैठकीत निषेध केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होताच शिवसेनेने नाणार प्रकल्पाच्या करारावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र याबाबत उद्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत चर्चा करू, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत म्हटले असल्याचे रावते यांनी सांगितले आहे. दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ
केंद्र सरकारने सेनेचे नेते केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना या कराराच्यावेळी बोलावले का? अशी विचारणा करताच रावते यांनी संताप व्यक्त केला. जिथे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच याची माहिती नाही तर मंत्र्यांना कशी मिळणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. केंद्र सरकारने कोकणातल्या या प्रकल्पाची कार्यवाही थांबवावी अन्यथा  गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही रावते यांनी यावेळी दिला .
आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. आमच्या पोटात एक आणि ओठात एक नाही. पण असे वागणाऱ्यांचे ओठ आम्ही नीट करू असा इशाराही रावते यांनी भाजपाला दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारणा केली  असता, नाणारच्या मुद्यावर मंत्रिमंडळ बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याने यावर बोलणे योग्य होणार नसल्याच त्यांनी यावेळी सांगितले.