’नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबात अद्याप प्रत्यक्ष करार नाही : मुख्यमंत्री 

0

मुंबई । कोकणामधील नाणार येथे ‘रिफायनरी प्रकल्प’ उभारण्याबाबत केंद्र सरकारने सौदी अरेबियाच्या सौदी अरमाको या कंपनीशी करार केल्याचे जाहीर झाल्यानंतर राजकीय वादंग सुरू सुरु झाले. या पार्श्‍वभूमीवर नाणार येथील प्रकल्पाबाबत अद्याप प्रत्यक्ष करार झालेला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

’केंद्र सरकारने संबंधित कंपनीशी केलेला करार हा ‘वेस्ट कोस्ट रिफायनरी’बाबतचा आहे. नाणार किंवा अन्य रिफायनरीबाबत प्रत्यक्ष करार झालेला नाही’, असे फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. ’नाणार येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा, असे केंद्र व राज्य सरकारलाही वाटत आहे. मात्र स्थानिकांना विश्‍वासात घेऊनच तो केला जाईल’, असेही मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे. ’चेंबूर येथे रिफायनरी गेली 50 वर्षे आहे, मात्र तेथे प्रदूषणाची समस्या नाही’, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.