नाणेकरवाडीत पत्नीचा कोयत्याने वार करून खून

0

संशयित आरोपीचे मुळ गावी पलायन : विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

चाकण : नाणेकरवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत पतीने पत्नीच्या डोक्यात वार करून व तोंडात ओढणीचा बोळा कोंबून खून केला. नंतर घराला कुलूप लावून मूळ गावी पलायन करत विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी त्याच्याव खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी यशवंत कॉलनीतील ज्योतिबा मंदिराजवळच्या भाड्याच्या खोलीत ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोदा प्रल्हाद रुपनर (वय 25, सध्या रा. यशवंत कॉलनी, ज्योतिबा मंदिराजवळ, नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे, मुळगाव ममदापुर, पो. येलडा, ता. आंबेजोगाई, जि. बीड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रल्हादने खुनाच्या घटनेनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खोलीला कुलूप लावून मूळगावी पलायन केले. त्याठिकाणी विष प्राशन केल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत यशोदा यांचा भाचा अमित सुमंतराव गडदे (वय 28, रा. आळंदी, काळे कॉलनी, ता. हवेली, जि. पुणे, मुळगाव विवखंडी, पो. सोनवळा, ता. अंबेजोगाई, जि. बीड ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून संशयित आरोपी म्हणून महिलेचा नवरा प्रल्हाद नरहरी रुपनर याच्यावर रविवारी दुपारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार लांडे यांनी दिली. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार हे अधिक तपास करीत आहे.