चाळीसगाव (सुर्यकांत कदम) । जे नाणं वाजत ते खणखणीत असत अशी जुनी म्हण आहे. परंतु याचा विपरीत प्रकार सध्या चाळीसगाव येथे पहायला मिळत आहे. याठिकाणी नागरिकांमध्ये १० रूपयाच नाण बंद झाल्याची अफवा पसरली आहे. अफवेने चाळीसगाव शहरासह तालुक्यात भिती निर्माण झाले आहे. १० रुपयांचे नाणे बंद झाल्याच्या अफवेने शहरात हे नाण कोणीही घ्यायला तयार नसल्याचे दिसुन येत आहे. मात्र ही अफवा कोणी पसरविली याबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही. याबाबत बँक व्यवस्थापकांशी संपर्क साधले असता त्यांनी हे नाणे व्यवहार सुरळीत सुरू असून ही अफवा असल्याची माहिती त्यांनी दैनिक जनशक्तीशी बोलतांना दिली.
नोटाबंदीची पुनरावृत्ती : नोटाबंदीच्या काळात नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या पाचशे आणि एक हजार रुपयाची नोट खपविण्यासाठी विविध प्रकारचे उपाय केले. नोटाबंदीच्या काळात घरात अथवा खीशामध्ये शंभर, पन्नास, वीस, दहा रूपयांच्या नोटा असतांना देखील प्रत्येक जण हा १००० आणि ५०० रुपयांची नोट घेऊन फिरतांना दिसत होता. या नोटा पेट्रोल पंपावर चलनात असल्याने वाहन चालक त्या नोटा घेऊन इंधन भरतांना दिसत होते. तसाच काहीसा प्रकार सध्या चाळीसगाव तालुका व शहरात बघायला मिळत असून दहा रूपयाच कोरं खणखणीत नाणं कोणीही घ्यायला तयार नसल्याने या नाण्याचा उपयोग पेट्रोल भरण्यासाठी करत असल्याचे दिसून येत आहे.
मिनी बँक गल्ले फोडले गेले
10 रुपयाचे नाणे चलनातुन बाद झाल्याची अफवा चाळीसगाव शहरासह तालुक्यात वार्या सरशी पसरल्यानंतर मिनी बँक संबोधले जाणारे गल्ले फोडण्याची सर्वानी घाई केली. गरीब कुटुंबातील महिला, पुरूष अथवा विद्यार्थी, विद्यार्थीनी तरूणी हे १० रूपयाच नाण गल्ल्यामध्ये (पत्र्याचा छोटा बंद डबा) साठवतात नाण छोट आणि किमत जास्त असल्याने १० रुपयाचे नाणे जास्त प्रमाणात साठविले जात असतात. मात्र अचानक नाणेबंदीची अफवा पसरलयाने गल्ला फोडण्याची घाई करण्यात आली.
महाराष्ट्र बँकेत १० रूपयाची नाणी स्विकारण्याबाबत आमचा नकार नाही. देवाण-घेवाणीचे व्यवहार नियमीतपणे सुरु आहे. बँकेमध्ये ज्यांनी हे चलन आणल्याचा नकार दिला जाणार नाही. जर जास्तीचे नाणे कोणी ग्राहकाने आणल्यास तर आम्ही बँकेच्या नियमानुसार स्विकारू. अजूनतरी असा प्रकार बँकेत घडला नाही. –पि.के सिंग, शाखाधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र
या अफवा असू शकतात, आमच्या बँकेत अशा प्रकारचे जास्तीचे नाणे घेऊन येणारे ग्राहक आले नाहीत. नियमीतपणे जे ग्राहक येतात थोड्या-फार प्रमाणात नाणे जमा होतात. जर ग्राहक १० रूपयाची नाणे घेऊन आल्यास आम्ही त्यांना नकार देत नाहीत. -विलास वाणी, शाखा प्रबंधक, सेंट्रल बँक
१० रूपयाचे नाणे चलनात सुरू आहेत. आमच्याकडे बँकेमध्ये याबाबतचे देवाण-घेवाणीचे व्यवहार
सुरळीत सुरू आहेत. नाणे बंदच्या अफवा आहेत कि नाही हे आम्हाला माहीत नाही, परंतू आमच्या बँकेत ही नाणी स्विकारली जात आहेत. खाते धारकांकडे असल्यास व त्यांनी बँकेमध्ये आणून भरणा केल्यास बँकेची काहीही हरकत नाही.
– जनकलाल काडेकर,
शाखाधिकारी स्टेट बँक