पुणे-आजी –आजोबा आपल्या मुलांचे बेबीसिटर आहेत या कल्पनेतून पालकांनी बाहेर येण्याची गरज आहे. मुलांचा सांभाळ करणे ही त्यांची जबाबदारी नाही असे पुणे कुटुंब न्यायालयाने स्पष्ट केले आहे. उतरत्या वयात नातवंड त्यांच्यावर ओझे होऊ नयेत असेही न्यायलयाने सांगितले आहे. एका महिलेने कुटुंब न्यायालयात धाव घेत आपल्या आणि मुलांच्या देखभालीकरिता याचिका दाखल केली होती.
महिलेने आपले सासु-सासरे मुलांचा सांभाळ करत नसल्याने त्यांना पाळणाघरात ठेवत लागत असल्याचा दावा केला होता. न्यायालयाने निकाल देताना महिलेला फटकारले आहे.
पालकांची प्राथमिक जबाबदारी
आपल्या लहान मुलांची काळजी घेणे ही आजी-आजोबांची नाही तर त्यांच्या पालकांची प्राथमिक जबाबदारी आहे. आजी-आजोबा तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी असतात. त्यामुळे उगाच त्यांच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करत, त्यांना नातवंडांचा सांभाळ करणे प्राथमिक कर्तव्य असल्यासजे सांगत दबाव आणला जाऊ शकत नाही’, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. महिलेने अशाप्रकारे आपल्या सासू-सासऱ्यांना जबाबदार धरणे अत्यंत चुकीचे असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.