भुसावळ- प्रभू येशू यांच्या जन्मोत्सवानिमित्त अलायन्स मराठी चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नववर्षाच्या प्रारंभापर्यंत अर्थात 1 डिसेंबरपर्यंत हे कार्यक्रम चालणार आहेत. कॅरल सिंगींग व प्रूुवार उपासना केली जात आहे. 24 रोजी सकाळी 10 वाजता चर्च स्वच्छता व डेकोरेशन, सायंकाळी सात वाजता ख्रिस्त जन्मोत्सव पूर्वसंध्या विशेष उपासणा करण्यात येणार आहे. 25 रोजी ख्रिस्त जन्मोत्सव विशेष उपासणा कार्यक्रमाचे आयोजन प्रेमचंद एस. जाधन यांनी केले आहे. पास्टर स्वप्निल नाशिककर मार्गदर्शन करतील. 26 रोजी दुपारी 12 वाजता चर्च परीसरात विविध स्पर्धा, 27 रोजी सायंकाळी सहा वाजता संडेस्कूल कार्यक्रमाचे आयोजन अनिता खंदळेकर, प्रतिभा वाघमारे, मिल्का नाईक यांनी केले आहे. 28 रोजी सकाळी 10 वाजता चित्रकला स्पर्धा व सायंकाळी सात वाजता भोजन, 29 रोजी सकाळी नऊ वाजता चर्च पिकनिक, 30 रोजी सकाळी सात वाजता प्रभुवार उपकार स्तुती उपासना होईल यात पास्टर स्वप्निल नाशिककर मार्गदर्शन करतील. 31 रोजी रात्री 9 वाजता भजन, वॉचनाईट सर्विस, 1 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता नवीन वर्ष विशेष उपासणा व प्रभुभोजन विधी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लाभ घेण्याचे आवाहन पास्टर स्वप्निल नाशिककर, अध्यक्ष प्रविण एम.ओहोळ, सेक्रेटरी मिलिप एस. फ्रांसिस, खजिनदार प्रेमचंद एस. जाधव, पंच जया फ्रांसिस मनी यांनी केले आहे.