एकनाथराव खडसे ; रावेरला कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या धनादेशाचे वाटप
रावेर- मुस्लिम समाजाच्या युवक-युवतीसाठी महाराष्ट्रातील पहिले इंजिनियरींग कॉलेज यंदापासून मुक्ताईनगरात सुरू होत असून मुस्लिम समाजाने नाथाभाऊला विसरू नये, समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रसंगी आपण विधानसभेतही राज्य सरकारकडे आवाज उचलतो, असे प्रतिपादन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे केले. रावेर तहसील कार्यालयात कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत लाभार्थींना धनादेशाचे वाटप माजी मंत्री खडसे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. याप्रसंगी खडसे बोलत होते.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी आमदार हरीभाऊ जावळे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, जिल्हा परीषद सदस्य रंजना पाटील, कैलास सरोदे, पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी, कविता हरलाल कोळी, योगीता वानखेडे, अशोक कांडेलकर, शिवाजीराव पाटील, जितु पाटील, पी.के.महाजन, यशवंत दलाल, गोपाळ नेमाडे, उमेश महाजन, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, वासु नरवाडे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.