नाथाभाऊ जास्त वेळ भाजपात राहणार नाही! – खा.संजय राऊत

0

जळगाव। हल्ली नाथाभाऊ अजित पवारांच्या कानात जास्त सांगायला लागले असून अजित पवारही त्यांच्या सांगण्यावरुन टाळ्या वाजवित असल्याने नाथाभाऊंच्या मनात काही तरी चाललं आहे. ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत काही सांगता येणार नाही, परंतु ते भाजपात जास्त काळ राहणार नाही, असे भाकित शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. जळगाव जिल्हा दौर्‍यावर असलेल्या खासदार राऊत यांनी अजिंठा विश्राम गृहात गुरूवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. जळगाव महानगरपालिका शिवसेना स्वबळावर व चिन्हावर लढेल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसे भाजपामध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे. हे खरे आहे त्यांच्या बोलण्यावरुन ते नाराज असल्याचे दिसून येते. त्यामुळे ते भाजपला सोडणार असल्याची चर्चा आहे. हे मात्र निश्‍चित असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.