नाथाभाऊ तुमच्यासाठी आम्ही केव्हाही तयार- अशोक चव्हाण

0
रावेर(प्रतिनिधी) :-  नाथाभाऊ तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तयार आहोत. ढकलण्याची वाट पाहू नका, आम्ही तुमच्यासाठी केव्हाही तयार असल्याचे कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे सांगितले.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यथा मांडल्यानंतर ते बोलत होते.  यावेळी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी खासदार ईश्‍वरलाल जैन, आमदार भाई जगताप, आमदार हरिभाऊ जावळे, खडसे रक्षा खडसे, राजीव पाटील, पंकज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.