जलसंपदामंत्र्यांचे एकनाथराव खडसेंना खुले चॅलेंज
रावेर- नाथाभाऊ, माझ्या जामनेर विधासभा मतदारसंघापेक्षा जास्त खासदार रक्षा खडसे यांना लीड मिळवून दाखवा, हवी तर पैजच लावा, असे खुले आव्हानच मुख्यमंत्र्यांसमक्ष संकटमोचक तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रावेरच्या सभेत दिले. खासदार खडसे यांच्या प्रचारार्थ रावेर येथे शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले.
…तर पैज लावा मात्र लीड जामनेर मतदारसंघातूनच
याप्रसंगी जलसंपदा मंत्री महाजन यांनी मनोगतात खासदार रक्षा खडसेंना जामनेर विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक लिड मिळवून देण्याचा दावा केला. माजी मंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यातील सख्य उभ्या महाराष्ट्राला ठावूक आहे. त्यातच खान्देशातील सर्व जागांवर भाजपाला विजयी करण्याचा विश्वास दिल्याने रावेरची जागादेखील त्यांच्यासाठी महत्वाची आहे. दोन दिग्गज नेते आता आपापल्या मतदारसंघातून नेमका खडसे यांना किती लिड मिळवून देतात? हेदेखील पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे मात्र महाजनांनी मुख्यमंत्र्यांसमक्षच खडसेंना आव्हान दिल्याची चर्चा सभा संपेपर्यंत कायम होती.