नादावडेकरांच्या चित्रांचे वरळीत प्रदर्शन

0

मुंबई । ठाण्यातील प्रसिद्ध चित्रकार किशोर नादावडेकर यांच्या जलरंगातील चित्रांचे बियाँड ऑर्डनरी हे चित्रप्रदर्शन 27 नोव्हेंबरपर्यंत वरळीतील नेहरू सेंटर येथे सुरू आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपायुक्त संदीप माळवी यांचीही विशेष उपस्थिती होती.

मान्यवरांनी दिली भेट
या प्रदर्शनाला आमदार अनिल परब, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार प्रमोद जठार, अभिनेता मंगेश देसाई तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट दिली. या प्रदर्शनात नादावडेकर यांनी देशभर भ्रमंती करून रेखाटलेल्या लेह, लडाख, अजिंठा, वेरूळ, राजस्थान, हंपी, बदामी, कोल्हापूर, बनारस अशा ठिकाणच्या काही चित्रांचा समावेश आहे.