नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेत बहाळचा समावेश

0

आता अनेक प्रकारच्या कामांना मिळणार गती

चाळीसगाव – नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना (पोकरा) यामध्ये तालुक्यातील बहाळ गावाचा समावेश आमदार उन्मेष पाटील, सभापती स्मितल बोरसे यांचे प्रयत्नाने झाल्याबद्दल यांचे अभिनंदनासाठी लागणारी कमेटी ११ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता विशेष ग्रामसभा घेऊन गठीत करण्यात आली.

या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वयक्तिक लाभ मिळणार असुन गावातील प्रत्येक बंधारे गाळमुक्त, नाला खोलीकरण, शेड नेट, शेतकरी गट उत्पादक कंपनी, कांदा चाळ, ठिबक सिंचन, इलेक्ट्रिक पंप असे अनेक प्रकारचे लाभ बहाळ गावाला मिळणार आहेत. कमीत कमी 3 कोटी रुपये या प्रकल्प मधून मंजूर होणार असुन जळगाव जिल्यातील फक्त ४६० गावे आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यात २१ गावे समावेश आहे व यात बहाळ गाव असून याचा डीपीआर तयार करण्यासाठी वॉटर नावाची एजन्सी ७ दिवस मुक्कामी राहून काम करणार आहे. यामध्ये सर्व ग्रामस्थांनी सहभागी होऊन आपल्या गावाच्या विकासाचे साक्षीदार होऊन शिवार फेरी करण्यासाठी यावे असे आवाहन पंचायत समिती माजी सदस्य दिनेश भाऊ बोरसे यांनी संपन्न झालेल्या ग्रामसभेत केले. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कृषी विभागातील श्री. देसले, श्री. वाणी, श्री. चव्हाण, ग्रामविकास अधिकारी श्री सूर्यवंशी व ग्रामस्थ उपस्थित होते.