नेरुळ : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर सुधाकर सोनवणे यांच्या शुभहस्ते महापालिका मुख्यालयात म्फीथिएटर येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, प्रशासन विभागाचे उप आयुक्त किरणराज यादव, परवाना विभागाच्या उप आयुक्त तृप्ती सांडभोर तसेच इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.