पाळधी । गाव, शहर व मानव कल्याणाच्या विकासासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असून दिपस्तंभसारखे महान आहे. सद्गुरूंच्या विचारांनी जगण्याला दिशा प्राप्त होते. नानासाहेबांच्या शिकवणीने मनुष्यास देवत्व प्राप्त होऊन त्यांच्या सानिध्यातून मानवाच्या जीवनात परिवर्तन घडते. शिस्त, समर्पन व निस्वार्थी सेवा ही समर्थ बैठकीची व्यापक भूमिका आहे. नानासाहेबाच्या प्रतिमेमुळे आम्हाला निस्वार्थी सेवेची प्रेरणा मिळत राहील, असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. शनिवारी पाळधी येथे ग्रामपंचायत कार्यालय व संपर्क कार्यालयात नानासाहेबाच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
नानासाहेबांच्या विचारातून सुजाण नागरिक निर्माण होतात. आजच्या तरुण पिढीला नानासाहेब विचार म्हणजे नवं संजीवनीच होय. यावेळी प्रमोद लोखंडे यानी शासन रोज गुन्हेगारी प्रवुत्तीचा माणसांना शासन करण्यासाठी कायदे करते मात्र नानासाहेबानी श्री बैठकिच्या माध्यमातून गुन्हगारी प्रवुत्ती नष्ट करण्याचे कार्य करत असल्याचे सांगितले. प्रमोद मुळे यांनी नानासाहेबांच्या कार्याचा लेखा जोखा मांडला तर गोविंद साळूखे यांनी प्रास्ताविकात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे 74 वर्षांपासूनचे कार्य विशद केले. यावेळी पं.स.सभापती यांचे पती सचिन पवार, संजय पाटील आदींनी समोयोचित भाषण केले. एलईडी स्क्रीन द्वारे प्रतिमा अनावरण व सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक चौधरी यांनी केले तर समारोप सरपंच अरुण पाटील यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पाळधी व परिसरातील श्री सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शिस्तीत सुमारे 3 हजार श्री सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
अनावरण प्रसंगी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, रावसाहेब पाटील, कृउबा सभापती लकी टेलर, अनिल भोळे, मुरलीधर कठोरा, नगरसेवक मनोज चौधरी, शरद तायडे, नाना सोनवणे, संजय पाटील, रावसाहेब पाटील, राजेंद्र चव्हाण, दिलीप पाटील, विश्वनाथ पाटील, अनिल पाटील, मुकुंद नंनवरे, सचीन पवार, पी.एम.पाटील सर , डॉ.कमलाकर पाटील, रमेश जळकेकर, शोभा चौधरी, शरद कासट, सरपंच अरुण पाटील, वैशाली पाटील, ग्रा.पं. सदस्य अनिल कसट, माजी सरपंच विजय पाटील, प्रकाश पाटील, भगवान धनगर, सोपान पाटील, चंद्रमनी नंनवरे, संजय महाजन, गोकुळ पाटील, बबलू पाटील, बंडू नारखेडे, आबा माळी, दीपक श्रीखंडे, ग्रामविस्तार अधिकारी नवल पाटील आदी उपस्थित होते.