चिंचवड – पिंपळेसौदागर येथील नाना काटे सोशल फाऊंडेशन व चंद्रनील सोशल फाऊंडेशन यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या कर्तबगार महिलांचा नगरसेविका शीतल काटे व नगरसेवक नाना काटे या दाम्पत्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मिसेस टीअरा इंडिया 2018 स्पर्धेच्या मानकरी डॉ. पल्लवी प्रसाद, मुंबई उच्च न्यायालयातील वकील व मिसेस इंडिया इंटरनॅशनल क्वीन 2017 चा बहुमान मिळालेल्या अॅड. अनुराधा शिंदे, सेंटर फॉर पॉलीसी स्टडीजच्या व आयआयटी मुंबईच्या पदवीधर रज्जी अजवाणी, पत्रकार वैशाली भुते, अंजली मरर, पूनम पाटील, मनिषा थोरात, लिना माने, मधुबनी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंजुश्री बंदपट्टे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार शर्वरी जळमकर यांनी मानले.