नाना पाटेकर तनुश्री दत्ताला पाठविणार नोटीस

0

मुंबई- गैरवर्तणुकीचा आरोप करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताला नाना पाटेकर कायदेशीर नोटीस पाठवणार आहे. ‘तनुश्रीने केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत. खोटी माहिती पुरवली आहे त्यामुळे तिला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ’, अशी माहिती नाना पाटेकर यांचे वकिल राजेंद्र शिरोडकर यांनी दिली आहे.

अमेरिकेहून नुकत्याच भारतात परतलेल्या अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप केला होता. २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केलं असा आरोप तिनं मुलाखतीत केला होता.