नवी दिल्ली । पाकिस्तानची गुप्तहेर संघटना असलेल्या ‘आयएसआय’ने भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट आखला आहे. पंजाबजवळील सीमेपलिकडून चार दहशतवादी जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. आयएसआयच्या या कटासंदर्भात आयबीने संबंधित राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये काही दहशतवाद्यांचे गट सक्रिय असल्याची माहिती याआधीच देण्यात आली आहे. त्यानंतर आता आणखी काही दहशतवादी भारतात सीमेपलिकडून घुसले आहेत, अशी माहिती मिळते. पाकिस्तानातील आयएसआय या गुप्तचर संघटनेने भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट रचला आहे. येत्या 15 दिवसांत जम्मू-काश्मीरमधील कथुआ, पंजाबमधील गुरुदासपूर आणि पठाणकोटमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा आयएसआयचा कट असल्याची माहिती ‘आयबी’ने दिली आहे.