नाभिक समाजबांधवांनी आपल्या व्यवसायात बदल करून सुधारणा करावी

0

भडगाव। नाभिक समाज बांधव यांनी बदलत्या काळानुरुप आपल्या व्यवसायात बदल करुन आपली कौंटुबिक आर्थिक स्थितीत सुधार करुन समाज प्रगतीस हातभार लावावा. असे विचार पाचोरा येथिल शिंदे अँकडमीचे प्रमुख तथा नगरसेवक अमोल शिंदे यांनी भडगाव येथे व्यक्त केले. ते येथिल नाभिक समाज विकास मंडळाच्या वतीने श्री. संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त यावेळी अपघात विमा प्रमाणपत्र वाटप प्रंसगी बोलत होते. श्री.संतसेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाचे वतीने समाज मंदीरात सेना महाराजमुर्तीचे विधीवत पुजन मंडळाचे अध्यक्ष संजय पवार यांच्याहस्ते सपत्नीक करण्यात आले. पुजनानंतर मंदीर परीसरात प्रमुख पदाधिकारी यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रात्री पिंपरखेडकर ह.भ.प. भगवान महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नाभिक समाज जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती.

संत सेना महाराज पालखी मिरवणूक
शनिवारी सकाळी समाज मंदीरातून संत सेना महाराज पालखीची भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. मिरवणुकीत पुरुष व महिलानी एकरंग सगती कपडे परीधान केल्याने मिरवणुक लक्षवेधक ठरली. पालखी मिरवणुकची सांगता समाज मंदीरात झाली. पालखी मिरवणुकीत शहरातील प्रमुख मान्यवर यांनी पालखीचे दर्शन घेतले यांत नगराध्यक्ष शामकांत भोसले, नगरसेवक तथा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, सचिन चोरडीया, शिवदास महाजन, डाँ. विजयकुमार देशमुख यांनी दर्शन घेतले व मंडळाचे अध्यक्ष संजय पवार याचा सत्कार केला.

पालखी मिरवणूक सांगता नंतर समाज मंदीरात शिंदे अँकडदमीचे प्रमुख तथा नगरसेवक अमोल शिंदे (पाचोरा), माजी नगराध्यक्ष तथा गट नेते प्रशांत पवार, नगरसेवक अमोल पाटील, पोलीस कर्मचारी पतसंस्था संचालक रविद्र पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, डी.डी.पाटील, सुधाकर पाटील, सुनिल कासार, जावेद शेख अविनाश अहिरे इ. मान्यवर उपस्थितीत समाज बांधवाना अपघात विमा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्यानंतर महाप्रसाद घेवुन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक मंडळाचे अध्यक्ष संजय पवार, सुत्रसंचलन सचिव हिलाल नेरपगारे यांनी केले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष भरत चव्हाण, काशिनाथ शिरसाठ, शिवाजी शिरसाठ, प्रभाकर नेरपगारे, दिलीप शिरसाठ, राजेद्र सोनवणे, सुभाष ठाकरे, निलेश महाले, कैलास चव्हाण, भरत ठाकरे, विजय पवार, नितीन शिरसाठ, गोरख वेळीस, संजय शिरसाठसह महिला मंडळ तालुकाध्यक्ष प्रमिला ठाकरे, शहरध्यक्ष पल्लवी शिरसाठ, सचिव वंदना पवार महिला सदस्यासह सर्व समाज बांधव यांनी परीश्रम घेतले.