नंदुरबार । पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल विद्रोही भाषा वापरल्या बद्दल जिल्हाभरात नाभिक समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजाची माफी मागवी अशी मागणीचे निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याने नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या असून या वक्तव्याचा जाहिर निषेध म्हणून शनिवार 18 रोजी महाराष्ट्र बंद व संपुर्ण महाराष्ट्रातील सर्व नाभिक सलून व इतर व्यवसाय बंद करण्यात आले.
शहाद्यात काळ्या फित लावीत तहसिल कार्यालयावर मुक मोर्चा
शहादा । राज्याचे मुख्यमंत्री यांनी जाहिर माफी मागावी व त्याचा निषेधार्थ शहादा तालुका नाभिक समाज व नंदुरबार जिल्हा जिवा सेना संघटनेतर्फे शहरातील प्रमुख रस्तावरून काळ्या फित लावीत तहसिल कार्यालयावर मुक मोर्चा नेत तहसीलदार मनोज खैरनार यांना निवेदन सादर केले. नंदुरबार जिल्हा जिवा सेना व शहादा तालुका नाभिक समाज यांनी शहरातील संत सेना चौक, तूप बाजारपासून काळ्या फित लावीत मुक मोर्चा मेन रोड, सोनार गल्ली, शाहि मशिद, काझी चौक, खेतिया चार रस्ता महात्मागांधी पुतळ्यापर्यंत तहसिल कार्यालयात निवेदन दिले. सुमारे 700 ते 800 समाज बांधव निषेध मोर्चात होते. तहसीलदार मनोज खैरनार यांनी निवेदन स्विकारून तुमचा भानवा शासना पर्यंत पोहचविण्यात येतील यावेळी नाभिक अध्यक्ष उध्दव जाभळे, प्रभाकर चित्ते, प्रदिप सोनवणे, लक्ष्मण सिरसाठ, प्रा अनिल साळुंखे, हेमराज पवार, कुष्णा चित्ते, अनिल ठाकरे, अजय मोरे, अविनाश पटेल, संतोष सोनगरे, खुशाल न्हावी, राहुल सौलंकी, निलेश जाभळे, अर्जून सोनवणे, योगेश सोलंकी, हेमंत सोनगरे, काशिनाथ चित्ते, बन्सी महाले, प्रविण मोरे, दिलीप कन्हैया, देवेद्र बागुल, सुरेश सौदाणे, गिरधर न्हावी, सोमनाथ पवार, जयराज बोरसेसह समाज बांधव उपस्थितीत होते.
मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य
मुख्यमंत्री विरोधकांना टोला मारतांना सांगितले की, ज्याप्रमाणे एक न्हावी आपला मित्र असतो, तो काय करतो, जर तीन चार ग्राहक बसले असतील तर एकला लावतो त्याची अर्धी कापतो, दुसर्याची अर्धी कापतो पळून गेला नाही पाहिजे म्हणून आणि तिसर्याची शेंडी कापतो.
नवापूरात दुकाने ठेवली बंद
नवापूर । येथील श्री संत सेना महाराज नाभिक हितवर्धक संस्थेतर्फे निषेध व्यक्त करत शनिवारी 18 नोव्हेंबरला सर्व नाभिक समाजाची दुकान बंद ठेवून तहसीलदार वसावे यांना निवेदन दिले. या वक्तव्याचा निषेध आणि मुख्यमंत्री यांनी जाहीर माफी या साठी आज महाराष्ट्र भर नाभिक समाजाने आपली व्यवसायाची दुकान बंद ठेवून निवेदन देण्यात आली यात नवापूर नाभिक समाजाने सहभाग घेतला आपली दुकान बंद ठेवली. श्री संत सेना महाराज नाभिक हितवर्धक संस्था, दुकानदार संघ व नाभिक युवक संघ यांचे पदाधिकारी सह सर्व नाभिक समाज बांधव उपस्थित होते.