नाभिक समाजातर्फे गुणगौरव सोहळा

0

धुळे । जिल्हा हुतात्मा वीरभाई कोतवाल शिक्षण मंडळातर्फे नाभिक समाजातील गुणवंतांचा सत्कार होणार आहे. दि. 12 ऑगस्टला हा कार्यक्रम होईल. शहर परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली जाते आहे. पहिली ते चौथी तसेच दहावी, बारावी, बीए, बीएड, बीएस्सी, एमए, एमएस्सी, आयटी, बीई, डिप्लोमा, तंत्र पदविका, वैद्यकीय पदवी परीक्षेसह विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार होईल.