उल्हासनगर । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल पुणे जिल्हयातील दौंड तालुक्यातील एका कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी नाभिक समाजाबद्दल त्यांच्या भावना दुखातील असे वक्तव्य केल्याबाबत त्याचा उल्हासनगरात नाभिक समाजातर्फे जाहिर निषेध करण्यात आला. उल्हासनगर नाभिक सेवा संघाच्या वतीने अध्यक्ष भरत राऊत, उपाध्यक्ष सुशिल पवार, गजानन घाडेकर, लहु शिंदे, भिकाजी शिंदे यांच्यासह उल्हासनगरातील हजाराहून अधिक नाभिक व्यवसायीकांनी या घटनेचा जाहिर निषेध करीत प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत नाभिक समाजाची माफी मागावी अशी मागणी करीत ते निवेदन शिष्टमंडळांनी प्रांत अधिका-यांना दिले. शनिवारी उल्हासनगर मधील सर्व नाभिक व्यवसायीकांनी आपली दुकाने बंद करून या निषेध मोर्चात सहभागी झाले होते.