जळगाव। नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील हातगाव कांबिचे नाभिक समाजातील शिंदे कुटुंबियातील मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी आरोपीविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी जळगाव जिल्हा नाभिक समाजातील विविध संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
महादेव उत्तम शिंदे शेतमजूर म्हणून शिवाजी भराट पाटील यांच्या शेतात कामाला जातात. भराट यांच्या वासनांध मुलाने शिंदे कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन याबाबत वाच्यता केल्यास परिवारास जीवे मारण्याची धमकी दिली होती. महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नाभिक हितवर्धक संघटना, नाभिक महिला मंडळ, नाभिक दुकानदार संघटना, बारा बलुतेदार महासंघ, नाभिक कर्मचारी संघटनांतर्फे जिल्हाध्यक्ष किशोर सुर्यवंशी यांच्यासह मनिष कुंवर, किशोर वाघ, अरुण वसाने, अनिल सोनगीरे, मनोहर सोनवणे, शिवाजी चव्हाण, रविंद्रल कोल्हे, पद्माकर निकम, एम.आर.सनांसे, बाळू नांद्रे आदींची उपस्थिती होती.