नाभिक समाजातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम

0

सोयगाव। येथे संत शिरोमणि संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजन, पालखी मिरवणूक व रात्री हभप संतोष महाराज आढावने यांचे कीर्तन झाले. नाभिक समाजाच्या वतीने संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी गाथा वाचन करण्यात आले. दूपारी सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली, शहरातील मुख्य रस्त्यावरुन जात श्रीराम मंदिरात समारोप करण्यात आला. ठगनराव भागवत पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. योगेश पाटील, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र दुतोंडे, पत्रकार संघाचे सुनील काळे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन व आरती झाली. रात्री गजानन महाराज मंदिरात हभप संतोष महाराज आढावने यांचे कीर्तन झाले संत साहित्य आणि त्यांचे कार्य हे आईप्रमाणे समाजाला प्रेरणादायी ठरतात, असे प्रतिपादन हभप संतोष महाराज आढावने यांनी केले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम यावेळी सिल्लोडचे माजी उपसभापती भाजप नेते ठगनराव पाटील, बंडु काळे, नाभिक समाजाचे नेते राजेंद्र आहिरे, नारायण एलिस, अप्पा पंडीत, विष्णु पंडीत, कोलते नाना, योगेश पाटील, राजू दुतोंडे, सुनिल काळे, नारायण मालोदे, सुनील वाघ, दत्तु एलिस, भगवान पंडीत, नाना एलिस, नितीन सोनवणे, एकनाथ एलिस, कैलास पंडीत, राजू एलिस, देवा पंडीत, अजय नेरपगार, अमोल नेरपगार, बापू पंडीत, रामकृष्ण पंडीत, सुनिल पाटील, शाम कोकाटे तसेच पंच क्रोशीतील सर्व गावकरी हजर होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तु एलिस, भगवान पंडीत, नितीन सोनवने आदिंनी परिश्रम घेतले.