नामनिर्देशनपत्र भरण्याचे प्रशिक्षण

0

बारामती । ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 ची संपूर्ण निवडणूक प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत. इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र भरण्याबाबतचे प्रशिक्षण बुधवारी (दि. 20) नवीन प्रशासकीय इमारतीतील तिसर्‍या मजल्यावरील मिटींग हॉलमध्ये सकाळी 11 वाजता देण्यात येणार असल्याचे असल्याचे तहसिलदार हनुमंत पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. इच्छुक उमेदवार, नागरीकांना प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकान्वये करण्यात आले आहे.