नामवंत लेखक उलगडतील पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांचे अष्टपैलू

0

सूर्योदय सर्वसमावेशक मंडळातर्फे आयोजन
जळगाव – शहरातील सूर्योदय सर्वसमावेशक सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने अष्टपैलू पद्मश्री डॉ भवरलालजी जैन या विषयावर जळगावी तिसर्‍या श्रद्धावंदन (स्मृती) दिनानिमीत्त एक दिवशीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कांताई सभागृहात करण्यात येत असून या साहित्य संमेलनात नामवंत लेखक भाऊंचे अष्टपैलू उलगडणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी दिली. या संमेलनात प्रा.डॉ. शरदचंद्र छापेकर (जळगाव) विषय – व्यक्तिमत्व भाऊंचे , ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुधीर भोंगळे(पुणे) विषय -भाऊंचं काळ्या मातीशी नातं , प्रा.डॉ.श्री.प्रभाकर जोशी (अमळनेर) विषय – भाऊंचे सामाजिक भान,इतिहासतज्ज्ञ नामवंत लेखक डॉ.श्री.श्रीनिवास साठे (कल्याण)विषय – इतिहास भाऊंचा घराण्याचा,श्री.गिरीश कुळकर्णी (अध्यक्ष आशा फाऊंडेशन जळगाव),विषय- शिक्ष णमहर्षी भाऊ ;प्रा.डॉ.श्री. सत्यजित साळवे (जळगाव) विषय- उद्योग व्यवसायतले शिल्पकार भाऊ प्रा.डॉ.श्री. तुषार चांदवडकर (चांदवड जि.नाशिक) विषय – भाऊंची साहित्य संपदा डॉ.भुजंगराव बोबडे(जळगाव) विषय – गांधी तिर्थ एक विचार हे भाऊंचे अष्टपैलू हे मान्यवर उलगडतील. तर निमंत्रितांचे कविसंमेलन कवि प्रा.बी.एन.चौधरी(धरणगाव) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. अशा प्रकारचे साहित्य संमेलन जळगावात प्रथमच रविवार दि.24 फेब्रुवारी 2019 रोजी होणार असून या निमित्ताने भाऊंचे कार्य साहित्य प्रेमी रसिकांच्या समोर येणार आहे. यशस्वीतेसाठी डी.बी.महाजन , प्रवीण लोहार यांच्या सह अनेक मान्यवर परीश्रम घेत आहेत.