नामविस्तार लढ्यातील शहिदांना श्रद्धांजली

0

पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त (आठवले गट) शहर शाखेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पिंपरी चौकातील डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात रविवारी (दि. 14) कार्यक्रम झाला. पक्षाचे शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नामविस्तार लढ्यात शहीद झालेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी रमेश चिमूरकर, विनोद चांदमारे, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष खाजा शेख, कार्याध्यक्ष गजेंद्र गायकवाड, युवक आघाडीचे सचिव दत्ता ठाणाबीर, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, राघू बनसोडे, भरत खरात, अल्पाफ शेख, कुणाल वावळकर, दिलीप समीदर, रमेश सूर्यवंशी, बबन साके, राजू उबाळे, विठ्ठल माने, अशोक गायकवाड, विनोद गायकवाड उपस्थित होते.