‘नायगावचा राजा’चे पाद्यपूजन

0

मुंबई । नायगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही ‘नायगावचा राजा’चा पाद्यपूजन सोहळा रविवार, 30 जुलै रोजी दुपारी 4 वाजता भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात आम्ही वादक, मुंबईचा पुणेरी व दोस्ती म्युझिकल ग्रुप हे मुंबईतील नामांकित पुणेरी ढोल ताशा ध्वजपथके सहभागी होणार आहेत. यंदा मंडळाचे 61 वे वर्ष असून साई समाधी शताब्दी वर्षापासून शिर्डी साई बाबा मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. शिर्डी येथील साई मंदिराप्रमाणे काकड आरती, पालखी सोहळा, साई चरित्र पारायण पठण, तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले.