नायगावातील दारू विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

0

यावल- तालुक्यातील नायगाव येथील दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी गावातील महिलांनी निवेदनाद्वारे यावल पोलिसांना केली आहे. गावातील अवैध दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती महिलांनी व्यक्त केली आहे. नायगाव येथील दामिनी बहुउद्देशीय मंडळांच्या अध्यक्ष मीनाक्षी नरेंद्र पाटील यांच्यासह महिलांनी बुधवारी यावल पोलिस ठाणेे गाठत पोलिस निरीक्षक डी.के. परदेशी यांना लेेखी निवेदन दिले. गावातील अवैद्य दारू विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. निवेदनावर 24 महिलांच्या स्वाक्षर्‍या आहेत.