उचंदे : मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे ओडिएफ तपासणी पथक दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषीत केल्यानुसार 2005 पर्यंत महाराष्ट्र हगणदारीमुक्त करायचे आहे. त्यासाठी ओडीएफ ही संकल्पना शासनामार्फत राबविली जात असून गावातील सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांची पाहणी करुन त्याचा अहवाल शासनाला देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सुध्दा जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा निश्चय केला आहे.
अभियानास ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन
या अभियानासाठी गावकर्यांना सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. याप्रसंगी सरपंच विक्रम म्हसाणे, ग्रामसेवक इंगळे, ग्रामपंचायत कर्मचारी विकास कोळी, रोजगार सेवक एकनाथर प्रधान, ओडीएफ पथक कर्मचारी गजानन सुरवाडे, कोचुरे, ग्रामस्थ चंपालाल महाजन, ईश्वर धनगर, सुधाकर महाजन उपस्थित होते.