नायगाव येथे सार्वजनिक शौचालयाची दयनिय अवस्था

0

यावल। तालुक्यातील नायगाव येथे किनगाव रस्त्यावरील पुरुषांच्या सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था झाली आहे. हे शौचालय कोसळून केव्हाही अपघात होऊ शकतो. तत्पूर्वी, ग्रामपंचायतने लक्ष देऊन त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
नायगावात पुरुषांच्या सार्वजनिक शौचालयास जागोजागी तडे पडले असून छतामध्ये पावसाचे पाणी मुरुन ते केव्हाही जमीनदोस्त होऊ शकते. हा प्रकार एखाद्याच्या जीवावर बेतणारा ठरू शकतो. या शौचालयाची भिंत कुणाच्या अंगावर पडल्यास जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यापूर्वी, ग्रामपंचायतीने दुरूस्ती करावी, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य बबलू तडवी, लुकमान तडवी, खंडू जावरे, शकील तडवी, इरफान तडवी आदींनी केली.