हॅनओव्हर । आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पुरूषांच्या 50 मी. प्रोनी नेमबाजी प्रकारात स्वीडनचा कार्ल ओलेसन आणि भारताचा गगन नारंग यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावित विश्वविक्रम मागे टाकला. आठ नेमबाजामध्ये झालेल्या या अंतिम फेरीत स्वीडनच्या ओलेसनने 229.8 गुण नोंदवित सुवर्णपदक पटकाविले तर भारताच्या गगन नारंगने 229.9 गुण नोंदवित रौप्यपदक मिळविले. नारंगचे सुवर्णपदक 0.1 गुणांनी हुकले. फ्रान्सच्या माँरेनोने 228.3 गुण घेत या प्रकारात कांस्यपदक घेतले.