औरंगाबाद : काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने नाराज अब्दुल सत्तार अपक्ष निवडणूक लढणार आहेत. आमदार अब्दुल सत्तार यांनी अखेर औरंगाबादमधून अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसविरोधात प्रचार करणार आणि काँग्रेसला नमवणार, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
औरंगाबाद आणि जालन्याच्या उमेदवारीवरून सत्तार नाराज होते. सत्तार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने याचा फायदा हा शिवसेना – भाजपच्या युतीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे. मतविभाजनाचा फटका हा काँग्रेसला बसलण्याची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये काँग्रेसची उमेदवारी सुभाष झांबड यांना उमदेवारी जाहीर झाल्यानंतर सत्तार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत बंडाचं निशाण फडकावले. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली होती. त्यानंतर ते भाजपात जाणार असे बोलले जात होते. मात्र त्यांनी भाजपात जाण्याचे वृत्त फेटाळले होते. कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी भूमिका स्पष्ट केली होती. कार्यकर्त्यांकडून त्यांना कॉंग्रेसकडून लढण्याची विनंती केली जात होती.