नाराज अब्दुल सत्तारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; याविषयावर झाली चर्चा !

0

मुंबई: काल शनिवारी शिवसेनेचे नवनियुक्त राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याच्या अफवेने एकच खळबळ उडाली होती. सत्तार यांच्या राजीनाम्याच्या गोष्टीने महाविकास आघाडी आणि शिवसेनेला मोठा धक्का मानला जात होता. मात्र शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तार यांना भेटण्यासाठी बोलविले होते. त्यानंतर त्यांनी मी राजीनामा दिलेला नसून उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर माझे स्पष्टीकरण देईल असे सांगितले होते. आज रविवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून त्यांनी कालच्या घटनेवरून स्पष्टीकरण दिले आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी उद्धव ठाकरेंसोबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेवेळी मी माझ्या राजीनाम्याची पुडी कोणी सोडली याची माहिती उद्धव ठाकरेंना दिली. आता उद्धव ठाकरे औरंगाबादमधील इतर नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर मी उद्या पुन्हा एकदा पक्षप्रमुखांना भेटणार आहे. दरम्यान, मी नाराज नाही, मी पक्षाचे काम करत राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीच्या सरकारचे खातेवाटप झाले आहे. अब्दुल सत्तार यांना महत्त्वाची खाती देण्यात आली आहे.