नारायणगावात दुचाकी चोरांना अटक

0

13 दुचाकी हस्तगत, दोन महिन्यातली दुसरी कारवाई

नारायणगाव : मोटार सायकल चोरी करणार्‍या अल्पवयीन मुलासह दोघांना पकडण्यात नारायणगाव पोलीसांना यश आले आहे. या आरोपींकडून 7 लाख 60 हजार रुपये किमतीच्या 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या असुन एका साथीदाराला पडकण्यात आले आहे. तसेच या अल्पवयीन मुलाला घर भाड्याने देणार्‍या घर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अजय गोरड यांनी दिली. नारायणगाव पोलीसांची सलग दोन महिन्यात दुसरी कार्यवाई आहे.

घरमालकावर ही गुन्हा दाखल
या प्रकरणात ताब्यात घेतलेला मुख्य आरोपी हा अल्पवयीन मुलगा (रा.नारायणगाव) येथील आहे. तर हृषिकेश निवृत्ती गुंजाळ (वय 20, रा.पारुंडे, ता.जुन्नर) हा त्याचा सहकारी आहे. या कारवाई विषयी सांगताना गोरड म्हणाले की, नारायणगाव पोलीसांनी 28 फेब्रुवारीला संशयावरुन अल्पवयीन मुलाला नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीसह बस स्थानक परिसरातुन त्याब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्याने गुंजाळ या सहकार्‍याच्या मदतीने नारायणगाव, मंचर चाकण, भोसरी परिसरातुन 13 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलीसांनी गुंजाळ या सहकार्‍याला अटक करुन पोलीसांनी आरोपीकडुन चोरीच्या तेरा दुचाकी जप्त केल्या असुन त्या नारायणगाव पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आल्या आहेत. तर घरभाडेकरुची माहिती पोलीसांना न देता घर भाड्याने दिल्याने घरमालक तानाजी विठोबा वाजगे ( रा.वाजगे आळी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधिक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शंकर भवारी, दिपक साबळे, रामचद्र शिंदे, प्रकाश जढर, शंकर कोबल, धनंजय पालवे, दिनेश साबळे, सचिन कोबल, संतोष दुपारगुडे, नविन आरगुडे, होमगार्ड मिनेश रोकडे, ठोंगीरे यांनी याविषयी तपास केला.