नारायणगावात शिवसेनेचे वर्चस्व

0

नारायणगाव । पुणे जिल्ह्यातील अनेक नेत्यांचे लक्ष लागलेल्या नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत अखेर योगेश (बाबू) नामदेव पाटे हे 5792 मतांनी सरपंचपदी विजयी झाले असून त्यांच्या श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनेलवर मतदारांनी विश्‍वास दाखवून सतरापैकी पंधरा सदस्य निवडून देऊन पॅनेलला एकहाती सत्ता दिली आहे.

पाटे यांच्या विजयामुळे नारायणगावात सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या सर्वच पदावर शिवसेनेने आपला भगवा रोवला आहे. त्यामुळे भविष्यात येणार्या विधानसभा निवडणुकीवर याचा निश्‍चितच परिणाम होणार हे स्पष्ट असून राष्ट्रवादीबरोबरच इतर पक्षांसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.या निवडणुकीत मतदारांनी सजगपणे मतदान करून एक तरुण, प्रशासनावर पकड, अन्याय, भ्रष्टाचाराविरुद्ध ठाम भूमिका घेणार्‍या आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणार्‍या उमेदवाराला विजयी केल्याने सर्वच ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच सलग तेवीस वर्षे सत्ताधारी असणार्‍या चंद्रशेखर कोर्हाळे गटाच्या श्री मुक्ताई ग्रामविकास पॅनेलला मतदारांनी मतदानातुन आपला कल दाखवत चितपट केले असुन या गटाला आपला एकही उमेदवार निवडुन आणता आलेला नाही. तसेच संतोष वाजगे गटाच्या श्री मुक्ताई हनुमान जनसेवक पॅनेलला अवघ्या दोन सदस्यांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत श्री मुक्ताबाई हनुमान ग्राविकास पॅनेलमधून वार्ड क्र. 1 : आरिफ महमंद सलिम आतार, ज्योती प्रविण दिवटे, वार्ड क्र.2 :संतोष मुरलीधर दांगट, रुपाली निलेश जाधव, वार्ड क्र.3: अश्‍विनी राजाराम गभाले उर्फ अश्‍विनी किरण ताजणे, अनिता सुदिप कसाबे, सारिका भागेश्‍वर डेरे, वार्ड क्र.4: विजय सखाराम वाव्हळ, राजेश दिनकर बाप्ते, सुप्रिया सुरेंद्र वाजगे उर्फ सुप्रिया प्रशांत (बाळा) खैरे, वार्ड क्र.5 : कुसुम रामदास शिरसाठ, पुष्पा रघुनाथ आहेर, वार्ड क्र.6 – गणेश पांडुरंग पाटे, मनिषा समिर मेहेत्रे, संगिता राजेंद्र खैरे हे 15 उमेदवार विजयी झाले असून संतोष वाजगे यांच्या श्री मुक्ताई हनुमान जनसेवक पॅनेलमधुन वार्ड क्र.1मध्ये संतोषकुमार रामदास पाटे, तर वार्ड क्र.5 मधुन रामदास सखाराम अभंग विजयी झाले आहे. सदस्य पदासाठी वार्ड 1 मधून ज्योती दिवटे या अवघ्या दोन मतांनी निवडुन आल्या असुन वार्ड 3 मधुन अश्‍विनी राजाराम गभाले उर्फ अश्‍विनी किरण ताजणे या पहिल्यांदा निवडणुक लढवून सुद्धा सर्वाधिक 847 मतांनी निवडून आल्या आहेत.

पाडळी-बारवच्या विकासासाठी कटिबद्ध
पाडळी-बारवच्या विकासासाठी गेली 15 वर्षे काम केले. अनेक विकास कामे पूर्ण केली. मात्र जनतेने दिलेला निकाल मान्य आहे असे शिवनेरी ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख संजय परदेशी यांनी सांगितले. संतोष केदारी या तरुणांस सरपंचपदासाठी उभे केले होते. जनता आमच्या मागे उभी राहिली. संतोष केदारी यांना सरपंचपदी बहुमताने विजयी केले. पाडळी-बारवच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत असे प्रचारप्रमुख राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पापाशेठ खोत यांनी सांगितले.

सरपंचपदी संतोष केदारी

जुन्नर । जुन्नर शहरालगतच्या पाडळी बारव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामविकास पॅनेलचे संतोष केदारी यांनी 403 मतांनी विजय मिळविला.शिवनेरी ग्रामविकास पॅनलचे शांताराम डोके यांचा केदारी यांनी पराभव केला.पाडळी बारव ग्रामपंचायतीवर संजय परदेशी यांची सलग 15 वर्षे सत्ता होती. संतोष केदारी यांनी विजय संपादन करुन परदेशी यांची सत्ता घालविली. संतोष केदारी हे जुन्नर शहरा राष्ट्रवादी शहराध्यक्ष पापाशेठ खोत यांचे खंदे समर्थक आहेत.

सरपंच पदासाठी मिळालेली मते याप्रमाणे
संतोष केदारी 1429मते (विजयी), शांताराम डोके 1023,गणेश कठाळे 117, डाँ.संतोष सहाणे81, रामदास काळे 41
वॉर्ड क्रमांक 1: अक्षय आल्हाट ग्रामविकास पॅनेल 245(विजयी ), दशरथ राजगुरु 168, सुनिता गावडे- शिवनेरी ग्रामविकास पॅनेल सौ.सुनिता गावडे 209 (विजयी ), जिजा जाधव 202,
वॉर्ड क्रमांक 2 : अदिती पानसरे – शिवनेरी ग्रामविकास पॅनेल – 237 (विजयी ), निता शेटे 176
वॉर्ड क्रमांक 3 : हनुमंत लोखंडे ग्रामविकास पॅनेल 309(विजयी ) संदेश भागवत 226, अरुण पापडे ग्रामविकास पॅनेल 295(विजयी) ,भानुदास कबाडी 253
वॉर्ड क्रमांक 4 : राजेश कारभळ ग्रामविकास पॅनेल 245(विजयी) ठकसेन दिवटे226, मनिषा लोखंडे शिवनेरी ग्रामविकास पॅनेल 304(विजयी),दर्शना वाघोले 167, कांता मस्करे- शिवनेरी ग्रामविकास पॅनेल 315(विजयी), सविंद्रा पानसरे 156
वॉर्ड क्रमांक 5 : दिगंबर बाळसराफ ग्रामविकास पॅनेल 382 (विजयी), अजय मोहिते 203, सय्यद औलादअली ग्रामविकास पॅनेल 357 (विजयी),संतोष चासकर 219, यास्मीन शेख ग्रामविकास पॅनेल 381(विजयी), शबाना शेख 196