मुंबईः महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी जे आत्मचरित्र लिहले त्यात त्यांनी अनेक मोठे खुलासे केले असल्याची माहिती एका खाजगी वृत्तवाहिनीने दिले होते. तसेच या आत्मचरित्रात राणेंनी मनोहर जोशी यांच्यावर आरोप केले आहे. या आरोपाचे जोशींकडून खंडन करण्यात आलं आहे. तसेच ज्या पक्षाने आपल्याला मोठे केले त्या पक्षाविरुद्ध बोलन योग्य नाही, असा सल्लाही जोशींनी राणेंना दिला आहे.
ज्या वेळी मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मला पदावरून हटवण्याचा निर्णय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा होता. बाळासाहेब ठाकरे एक मोठेआश्चर्यच होते. कुठल्याही सभेला जातांना बाळासाहेब मला घेऊन जायचे, त्यामुळेच माझे शत्रू निर्माण झाले. काही शत्रू असतात, काही अतिरेकी असतात, असा जोशी यांनी टोमणा मारला. राणेंच्या शिक्षणावर बाबत ते म्हणाले कि, शिक्षणात माणसाचे आचार-विचार महत्त्वाचे असतात. राणेंनी केलेल्या आरोपामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं जोशींनी स्पष्ट केले आहे. राणेंनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे की, माझ्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडावे लागल्याने जोशींच्या मनात एक प्रकारचा राग होता. वरवर जरी जोशी शिवसेनेचे चिंतक असल्याचे वाटत असले तरी त्यांच्यामुळे पक्षाची आज अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी टीका नारायण राणेंनी आपल्या आत्मचरित्रातून केली आहे.