उरुळी कांचन पुणे: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते,जनतेच्या भल्यासाठी निरंतर कार्यरत राहणारे कर्मयोगी समाज सुधारक हभप डॉ.रवींद्र दि. भोळे यांना नुकताच नारायण सेवा पुरस्कार जाहीर झालेला आहे. श्री नारायण मानव सेवा समिती जयपुर राजस्थान यांच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेचा हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. डॉ.रवींद्र भोळे हे सामाजिक न्यायाचे ऊर्जास्तोत्र व शांतीसेनेचे पुरस्कर्ते असुन ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार, अपंग सेवक ,वृक्षमित्र आहेत,नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांनी कार्य केलेले आहे. महाराष्ट्रातील अनेक अपंग, दिव्यांग, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, अखंड हरीनाम सप्ताह,वैद्यकीय धार्मिक,वैद्यकिय, संस्था मध्ये डॉ.रवींद्र भोळे पदाधिकारी असुन समर्पित भावनेने कार्य करीत आहेत. पद्मश्री डॉ.मनीभाई देसाई प्रतिष्ठान निती आयोग सलग्नित, मिनिस्ट्री ऑफ एम एस एम इ भारत सरकार सलग्नित संस्थेच्या वतीने अनेक उपक्रम राबवले आहेत. मराठवाडा भूकंप, कोरोना पाण्डेमिक, गुजरात भूकंपातील लोकांना धन्यवाद गोळा करणे उरुळी कांचन येथील गॅस्ट्रो इंट्राय टीस साथी मध्ये कार्य, पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा डॉ.रवींद्र भोळे यांनी केलेली आहे. डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र द्वारे अत्यल्प दरातील सेवा पुरवीत आहेत. नारायण सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.