नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

धुळे; : महिला सक्षमीकरण क्षेत्रात महिलांसाठी अपवादात्मक स्थितीत वेगवेगळ्या विषयावर उल्लेखनीय कार्य करणारी व्यक्ती, संस्था यांना केंद्र सरकारतर्फे नारी शक्ती पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी 31 जानेवारी 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व
बालविकास अधिकारी सचिन भास्कर शिंदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.
महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण क्षेत्रात महिलांसाठी अपवादत्मक स्थितीत वेगवेगळ्या
विषयावर एखादी व्यक्ती, संस्थेने स्वयंप्रेरणेने महिलांच्या विकासाकरीता उल्लेखनीय कार्य केलेले असल्यास, अशा व्यक्ती किंवा संस्थांना केंद्र सरकारमार्फत नारी शक्ती पुरस्कार दिला जातो.
स्वयंसेवी संस्थांना नामांकन भरावयाचे असल्यास संस्थेचे या क्षेत्रातील कार्य कमीत कमी पाच वर्षे असावे.
नामांकन भरणाऱ्यांना आधी नारी शक्ती पुरस्कार किंवा स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नसावा. या
पुरस्काराकरीता नामाकंन सादर करावयाचे असल्यास विहित नमुन्यातील अर्जाबाबतची सविस्तर माहिती केंद्र सरकारच्या www.awards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नामाकंन फक्त ऑनलाईन स्वीकारले जातील.