शिरपूर । पश्चिम भागातील शेतकर्यांनी भामपूर शिवारात नालाखोलीकरण करण्यात यावे अशी मागणी केली होती. शेतकर्यांच्या मागणीनुसार नवे व जुने भामपूर शिवारात नालाखोलीकरण कामाचे उद्घाटन भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्या हस्ते मंगळवारी 21 रोजी करण्यात आले. राहुल रंधे फाऊंडेशनमार्फत नालाखोलीकरणाचे काम करण्यात येत आहे. तालुक्याच्या या भागात नेहमीच पाणी टंचाईची असते. या भागात जळोद व उखळवाडी असे दोन धरण आहेत. या धरणातून सर्व भागाकडे पाटचार्या गेल्या आहेत. त्या पाटचार्या मार्फत शेतीस पाणी पुरवठा होत असतो परंतु ह्या पाटचार्या खूप जुन्या झाल्या असून कित्तेक वर्षापासून यांचे खोलीकरण झालेले नाही त्यामुळे धरणाचे पाणी व पावसाळ्यात येणारे पाणी शेतीपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे शेतकर्यांनी नालाखोलीकरणाचे काम व्हावे अशी मागणी केली होती.
पूर्ण बागायतीसाठी प्रयत्न
या भागातील प्रमुख समस्या हि पाटचारीची संदर्भातच होती. शासन जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत एक उत्तम कार्य करत आहे. यामध्ये प्रत्येक वर्षी आराखडा तयार करून 22 ते 25 गाव घेऊन त्या ठिकाणी साठवण बंधारे व नालाखोलीकरणाचे काम संपूर्ण राज्यात सुरु आहे, शेतकर्यांचे जिवनमान उंचवावे, जमीन पूर्ण बागायत व्हावी तसेच शिरपूर तालुक्यातील प्रत्येक शेतकरी परिवार सार्वत्रिक समृद्ध व्हावा या करिता वैयक्तिक स्वरूपात तसेच राहुल रंधे फॉऊंडेशन मार्फत हे कार्य नेहमी केले जाईल असे तालुकाध्यक्ष राहूल रंधे यांनी यावेळी सांगितले.
पाणी पातळी वाढणार
या भागात नालाखोलीकरणामुळे पाणी संचयासाठी मोठी मदत होणार आहे व त्यामुळे येथील पाण्याची पातळी ही वाढणार असून त्याचा प्रत्यक्ष फायदा या ठिकाणची शेतीस होणार आहे अशा उपक्रमाद्वारे शासनाला आधारभूत मदत होत आहे. या उपक्रमामुळे या भागातील शेकडो शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे. भामपूर सरपंच बाळासाहेब पाटील, उखळवाडी वि.का.सह सोसायटी चेअरमन छबीलाल देवरे, राजेंद्र बोरसे, अर्थे बु उपसरपंच प्रशांत पाटील, साहेबराव कोळी, टिंकू ढीवरे, सुरेश देवरे, शांताराम पाटील, भगवान पाटील, शशिकांत पाटील, नाना बोरसे, प्रकाश देवरे, संतोष पवार, किशोर पाटील, शेखर पाटील, रुपेश पाटील, विक्की देवरे, प्रकाश पाटील, भैया बुवा, अशोक सोनवणे, दिपक ठाकूर, निलेश महाजन, तुषार सत्यविजय, शेखर माळी, गजू पाटील यांच्यासह भामपूर, विखरण, अर्थे गावातील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकर्यांना फायदा
यावेळी नवे भामपूर सरपंच बाळासाहेब पाटील यांनी भागात कित्तेक वर्षापासून पाटचारी खोलीकरण काम झालेले नाही, त्यामुळे आम्हा शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणी सामोरे जावे लागत होते परंतु राहुल रंधे फॉऊंडेशन मार्फत ह्या कामाची सुरुवात पाहून या भागात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, नक्कीच याचा फायदा येथील शेतीकरी बांधवांना होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.