नालासफाई आभावी नागरीकांचे आरोग्य धोक्यात

0

दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी केला संताप

पाचोरा: वरखेडी व भोकरी ग्रामपंचायतिच्या वतीने जिल्हा परिषदेच्या स्वच्छता निधीतून बांधलेल्या नाल्याची स्वच्छता होत नसून, नाल्याच्या स्वच्छते अभावी नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या ढीसूळ कामकाजाबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. नाल्यातून वाहणारे घाण पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर व नागरिकांच्या घरांपर्यत येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे २००४ साली जि.पच्या स्वच्छ अभियानांतर्गत वरखेडी, भोकरी या दोन ग्रामपंचायतीच्या वतीने संयुक्त नाला बांधण्यात आला आहे. भोकरी शिवारातील राजेबा मंदिरा पासून ते वरखेडीच्या बाजारपेठेपर्यंत ५ ते ६ फुट खोलीच्या नाल्याद्वारे दोन्ही गावातील सांडपाण्याचा निचरा या नाल्यातून होतो. नाला बहुळा नदी पर्यत वाहत जावून तसेच वरखेडी, भोकरी शिवारातील शेतातील पाणीदेखील याच नाल्याद्वारे वाहते. सद्यस्थितीला नाल्याची दोन्ही ग्रामपंचायतिच्या वतीने वेळोवेळी देखभाल व स्वच्छता होत नसल्याने घाणीने तुडूंब भरला आहे. व्यापारी व नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही ह्या नाल्याची स्वच्छता ग्रा.प च्या वतीने केली गेली नाही. गेल्यावर्षी नाला साफ झाल्याचे वरखेडी ग्रामस्थांनी सांगितले. शासनाच्या वतीने तालुक स्तरावर पावसाळ्यापूर्वी स्वच्छता अभियान राबविण्यासाठी समित्या गठीत केल्या जातात. आरोग्याशी संबंधित महत्वपूर्ण कामाकडे सर्वाचेच दुर्लक्ष असल्याने वरखेडी भोकरीचे ग्रामस्थ नाल्याची स्वच्छता होत नसल्याने त्रस्त झाले आहेत. स्वच्छता होत नसल्याने रोगराई वाढत असून नाला सफाईची संयुक्त जबाबदारी दोन्ही ग्रामपंचायतीची आहे.गटविकासअधिकारी जि.प कार्यकारी अधिकारी यांनी या बाबत तत्काळ लक्ष देण्याची गरज असुन वरखेडी भोकरीच्या नागरिकांना आरोग्याच्या मुलभूत सुविधांचा लाभ मिळावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.