भुसावळ- नालासोपारा स्फोटकेप्रकरणी एटीएसने अटक केलेल्या साकळी येथील लिलाधर उर्फ विजय लोधी व वासुदेव सूर्यवंशी यांना 17 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. संशयीतांची कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा सोमवारी मुंबई न्यायालयात हजर केले असता 25 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आतापर्यंत संशयीतांच्या चौकशीत एटीएसला नेमके काय आढळले? याबाबत माहिती कळू शकली नाही.