नालासोपार्‍यात मोरेगावात युवकाची हत्या

0

वसई- एका कार्यामात नाचताना झालेल्या भांडताना एका तरूणाची काही युवकांनी चाकूने वार करून हत्या केली आहे. ही घटना नालासोपारा मोरेगाव येथेरात्री 11.30 वाजता घडली. विनय डिवचलकर (21) असे मयत तरूणाचे नाव आहे.

मोरेगावात रात्री एका कार्यामात डी. जे. वर नाच सुरू होता. त्यावेळी नाचण्यावरून वाद सुरू झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. या हाणामारीत योगेश सवीनकर, मनोज सुर्वे आदि युवक होते. त्यानंतर तेथे योगेश व नरेंद्र शर्मा हे दोन युवक आपल्या सात – आठ साथीदारांसह तेथे आले व त्यांनी हाणामारीला सुरूवात केली. त्यावेळेलाविनय डिवचलकर भांडण मिटविण्यास गेला असता त्याच्यावर चाकूचे वार करण्यात आले. यात विनयचा जागीच मृत्यू झाला. या हाणामारीत पाच जण जखमी झाले.त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तुळींज पोलिस स्थानकात योगेश , नरेंद्र व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.